बुधवार, २२ एप्रिल, २०१५

संघर्षास तयार रहा..

मित्रहो, 
नाशिक जिल्ह्यातील पुरवठ्याच्या विषयाबाबत महसुल विभागातुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधीत सात तहसिलदारांना चौकशीपुर्वीच निलंबित करणार असल्याचे कळले आहे. 

याविषयात आपण शासनाकडे आधी चौकशी व मग कारवाई अशी मागणी केली होती. ती मान्यसुध्दा झाली होती व तात्काळचे निलंबन टाळण्यात आपल्याला यशसुध्दा प्राप्त झाले होते. 

मात्र संबंधित तहसिलदारांना निलंबित करण्याची विधानभवनात घोषणा झालेली असल्यामुळे त्यांना निलंबीत करणे क्रमप्राप्त ठरवुन शासनाने आपली विनंती अमान्य केल्याचे दिसत आहे. 

यातुन एकच गोष्ट स्पष्ट होत आहे की ज्या पुरवठा विभागाचे काम आपले नसतानाही आपण करत आहोत त्या पुरवठा विभागाच्या कामामुळेच आपले अधिकारी, कर्मचारी अडचणीत आले आहेत. 

आजवर आपण महसुल विभागासोबतच अन्न व नागरी पुरवठा, समाज कल्याण, ग्राम विकास, कृषी , पाणी पुरवठा, रोहयो, शिक्षण इ. सर्व वेगवेगळ्या विभागाची कामे अत्यंत प्रामाणिक पणे करत आलो आहोत..!! 

परंतु आता आपला संबंध नसलेल्या पुरवठा विभागाला सोडण्याची वेळ आलेली आहे .
कारण याच विभागामुळे आपल्यावर कारवाई होत आहे. 
पुरवठा विषयक काम करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, सहाय्यक लेखाधिकारी नाही. तरी सुध्दा आपण हे काम करत आहोत. आता मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी त्यांच्या विभागाचे स्वतंत्र अधिकारी व कर्मचा-यांची नेमणुक करुन पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. 
पुरवठा विभागाचे काम सोडण्याबाबत रितसर निवेदन तात्काळ शासनास दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी तयारीत रहावे. 


धन्यवाद....!!

आपला 

सुरेश बगळे 
कार्याध्यक्ष , 
महा. तह , ना.तह संघटना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा