शुक्रवार, ८ मे, २०१५

एफबीवर, व्हॉटसअॅपवर स्टेटस अपडेट करताय...फोटो टाकताय. काळजी घ्या..

एफबीवर, व्हॉटसअॅपवर स्टेटस अपडेट करताय...फोटो टाकताय. पण तुमचं हे अति सोशल अपडेटिंग तुमच्या सोशल नेटवर्किंगवर नजर ठेवून असलेल्या स्मार्ट चोरांनाही अपडेट करतं हे तुम्हाला माहितीय का?
'ऑन गोवा टूर विथ फॅमिली' असं विमानतळावरील चेक इन पडल्यानंतर काही तासातच त्यांच्या घरी चोरी झाली. चोरांना अटक झाल्यानंतर, कॉमन फ्रेंडच्या अॅक्टिव्हीटीमुळे हे घर रिकामी असल्याचं चोरांना समजल्याचं समोर आलं.
'वाढदिवसाला हिऱ्याची अंगठी मिळालीय, उद्या शाळेत घालून येईन.' हे स्टेटस एका मुलीनं एफबीवर टाकलं होतं. दुसऱ्याच दिवशी शाळेतून घरी येताना तिच्या फेसबुक फ्रेंडनं अंगठी लुटून नेली. आजीला दागिने मोजण्यात ती मदत करत होती. दागिन्यांचा फोटो तिनं फेसबुकवर 'फिलींग रिच'च्या कॅप्शनसहीत अपलोड केला. आणि त्याच रात्री तिच्या आजीच्या घरी चोरी झाली. एका जाहीर कार्यक्रमाला अमुक ठिकाणी जातेय हे तिच्या फेसबुक स्टेटसवरून कळलं. चोरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी फोन करून त्याची नेमकी वेळ जाणून घेतली आणि घरी कुणी नसताना वेळ साधून डल्ला मारला.
दोन आठवडे लंडनला मुलाकडे जातेय असं सांगणाऱ्या स्टेटस अपडेटचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केलं.
आपल्याकडे आणि परदेशात घडलेली ही उदाहरणं खूपच बोलकी आहेत. यामुळे तरी सोशली अतिअॅक्टिव्ह असणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडतील असं वाटतं. सध्या सुट्ट्यांचा मोसम आहे. सुट्टीसाठी बाहेरगावी जाताना, कामासाठी दौऱ्यावर जात असताना अनेकांना विमानतळ, रेल्वे स्टेशनच्या नावाने फेसबुकवर चेक इन करण्याची सवय असते. मात्र हीच गोष्ट त्यांच्यासाठी घातक ठरु लागलीय. या पोस्टच्या माध्यमातून आपण चोरांना क्लू देत असल्याचं अनेकांच्या लक्षातच येत नाही.
खास करून उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या असताना असे चेकइन्स, फोटो अपलोड करत गावाकडची मज्जा सोशल करणारे अनेकजण फेसबुकवर दिसतात. त्यामुळेच उन्हाळ्यात अशी डिजिटल हेरगिरी करून चोऱ्या होण्याचे प्रकार वाढलेत असं सायबरतज्ज्ञ सांगतात. म्हणून उगाचच ट्रिपच्या ठिकाणाहून चेक इन करणं, फोटो अपडेट करणं शक्यतो टाळावं. तर हे स्मार्ट चोर तुमच्या घरांपासून लांब राहतील, असं 'रिस्पॉन्सीबल नेटिझम'चे उन्मेश जोशी यांनी सांगितलं.
स्टेटस अपडेट टाळा
आजकालचे चोर खरोखरच स्मार्ट झाले आहेत. तुमच्या सोशल प्रोफाइलवर त्यांची नजर आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्यटनस्थळी असताना तिथून फोटो आणि स्टेटस अपडेट करणं टाळा. घरी आल्यावर निवांतपणे ते करता येईल. तुम्ही घरी नसताना तुमचं सोशल अकाऊंट चोरांसाठी आमंत्रण ठरेल अशी कोणतीही पोस्ट करणं टाळा.
-अॅड. प्रशांत माळी, सायबर कायदे आणि सुरक्षातज्ज्ञ

केवळ ३४२ रुपयांमध्ये मिळणार ..चार लाखांचा विमा ....नागरिकांनी घ्यावा लाभ


सर्व राष्ट्रीय बैकैत सेवा
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा दोन
लाखांचा तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
हादेखील दोन लाखांचा अपघाती विमा अशा
एकूण चार लाखांच्या योजना केवळ ३४२ रुपयांत
सामान्य नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
मंगळवारपासून या योजनेला प्रारंभ होणार आहे.
त्यासाठी २५ मेपर्यंत अर्ज उपलब्ध राहणार आहेत.
सामान्य नागरिकांना जून २०१५ ते ३१ मे २०१६ पर्यंत
या दोन्ही योजनांमुळे चार लाखांच्या विम्याचे
कवच मिळणार आहे.
सर्वसामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत
यावे यासाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा
योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या
दोन नवीन योजनांची घोषणा केंद्र सरकारकडून
करण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनांची
प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली
असून, आज पासून बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये
अर्ज उपलब्ध होणार आहेत. त्यात प्रधानमंत्री
जीवनज्योती विमा योजना हा दोन लाखांचा
नैसर्गिक मृत्यूसाठी असून, तो १८ ते ५० वयोगटातील
नागरिकांसाठी तो असेल.
केवळ ३३० रुपयांत हा विमा उतरवता येणार आहे. तर
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा दाेन
लाखांचा विमा अपघातात दुखापतीसाठी तसेच
अपंगत्वासाठी लागू असणार आहे. हा विमा केवळ
१२ रुपयांत वर्षभरासाठी उपलब्ध असेल. १८ ते ७०
वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता
येईल. त्यामुळे सामान्य नागरिकांनी ३४२ रुपये
भरल्यास त्यांना चार लाखांचे विमा कवच प्राप्त
होणार आहे. सर्व बँकेच्या सर्वच शाखांमध्ये
यासाठी अर्ज उपलब्ध राहणार असून, ग्राहक सेवा
केंद्रात सदर रकमेची पावती भरून दिल्यासही हा
विमा खातेधारकांना काढता येईल.
नागरिकांनी घ्यावा लाभ
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दोन विमा योजना
सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असून देशतील
जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा
प्रयत्न आहे. त्यासाठी आज पासून बँकेच्या सर्वच
शाखांमध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. केवळ १२
आणि ३३० रुपयांत एकूण चार लाखांचा विमा
मिळणार असल्याने नागरिकांनी या योजनेचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक
हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा
संरक्षण.. केंद्र शासनाने दोन नवीन योजना सुरु
केल्या आहेत...
१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
रुपये ३३० वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ५०
लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ
घेवू शकतो
२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
रुपये १२ वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ७०
लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू
झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ
घेवू शकतो
दोन्ही योजनेचा लाभ तुम्ही एकत्रित रित्या घेवून
रुपये ३४२ च्या वार्षिक हप्त्यामध्ये ४ लाख रुपयांचे
संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्या बँकेशी
संपर्क साधा..

शुक्रवार, १ मे, २०१५